शिवभक्तांचा जल्लोष: बार्शी-कुर्डुवाडीत विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

शिवभक्तांचा जल्लोष: बार्शी-कुर्डुवाडीत विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

 शिवभक्तांचा जल्लोष: बार्शी-कुर्डुवाडीत विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी




बार्शी/कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त): शिवजयंतीनिमित्त बार्शीत शिवभक्तांच्या वतीने छत्रपती  शिवाजी   महाराज  यांची  नेत्रदीपक पालखी सोहळा उत्साहात पार पडला. पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.

शिवाजी महाविद्यालयासमोरील तसेच शिवसृष्टी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दर्शनासाठी शिवभक्तांसह महिलांची मोठी गर्दी उसळली होती. बार्शीतील अलीपूर रोड, उपळाई रोड, सोलापूर रोड, लातूर रोड, तुळजापूर रोड यांसह पांगरी, आगळगाव, कुसळंब, चिखर्डे, गौडगाव, मळेगाव, घारी आदी भागांतही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

आश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून पालखीचा शुभारंभ झाला. पालखीसमोर पारंपरिक पोशाखातील घोडेस्वार मावळे, झांज पथक आकर्षण ठरले. शहरात ठिकठिकाणी गुलाबपुष्पांची उधळण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेला हा पालखी सोहळा प्रेरणादायी परंपरा बनला आहे.

पालखी मार्गावर पाणी पाऊच, मसाले दूध, आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. समाजात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सोहळ्यानंतर शिवभक्तांनी मार्गावरील स्वच्छता मोहीमही राबवली.
कुर्डुवाडीतही विविध उपक्रम

कुर्डुवाडी येथे शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांत विविध उपक्रमांद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास आकर्षक सजावट करून अभिषेक करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष जयश्री भिसे, धनंजय डिकोळे, बाबासाहेब गवळी, जगन्नाथ क्षीरसागर, महेश गांधी, यशवंत शिंदे, समीर मुलाणी, अमर माने, डॉ. मोहसीन मकनू, शुभ्रा गोरे, वृषाली गांधी, स्नेहा गवळी, शकील तांबोळी, संतोष क्षीरसागर, आनंद पवार, प्रा. राजेंद्र दास, डॉ. विलास मेहता, दत्ता काकडे, शिवाजी गवळी, अगरचंद धोका, माणिक श्रीरामे आदी उपस्थित होते.

मावळा ग्रुपच्या वतीने पालखीचे आयोजन करण्यात आले. बसस्थानक परिसरातील रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फेही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक आयुब मुलाणी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उद्योजक रणधीर शिंदे, प्रविण गव्हाणे, रफिक शेख, आदम शेख, शाहरुख शेख, सुनील कारंजकर, पांडुरंग गोरे, अजिंक्य ढवळसकर, शाकिर शेख, रफिक सैय्यद आदी उपस्थित होते.


चौकट
शिवसृष्टीत दिवसभर अभिवादनासाठी गर्दी

शिवसृष्टी येथे शिवजयंतीनिमित्त आश्वारूढ पुतळ्यासह परिसराचे विविधरंगी फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले होते. दिवसभर अभिवादनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी होती. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आकर्षक आतिषबाजीने वातावरण दुमदुमून गेले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages