नवा देश घडविण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करा-संजय आवटे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

नवा देश घडविण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करा-संजय आवटे

 नवा देश घडविण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करा-संजय आवटे


अनगर (कटूसत्य वृत्त):- बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती,लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील यांची पुण्यतिथी व महाविद्यालयासाठी गेल्या २५ वर्षात योगदान दिलेले माजी प्राचार्य,प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विचारवंत संजय आवटे हे होते व अध्यक्षस्थानी महाराष्र्ट राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष मा.ना.राजन पाटील हे होते.या प्रसंगी राजन पाटील यांनी शिक्षणातून संस्कार,मूल्याधिष्ठित व कौशाल्याधिष्ठित शिक्षण गरजेचे आहे तसेच त्यांनी संस्थेच्या प्रगतीविषयक मार्गदर्शन केले.या प्रसंगी संजय आवटे यांनी शिक्षण प्रवाहात मुले,पालक,शिक्षक,शिक्षण व्यवस्था,करिअर,शिक्षण व्यवस्था हे विविध उदाहरणाद्वारे सांगितले,नवा देश घडविण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करा असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रा.डाॅ.सहदेव रसाळ यांनी माजी प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून महाविद्यालयाच्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.डाॅ.संतोष थिटे यांनी करुन दिला.सूत्रसंचालन प्रा.महादेव चव्हाण यांनी केले व आभार प्रा.डाॅ.विशाल कदम यांनी मानले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले, माजी प्राचार्य डाॅ.विलास अरबाळे,प्राचार्य महादेव चोपडे,उपमुख्याध्यापक माधव खरात माजी प्राध्यापक  शिक्षक,प्रशासकीय कर्मचारी,ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages