प्रा.कुंडलिक गुंड यांना विद्यापीठाची पीएचडी पदवी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

प्रा.कुंडलिक गुंड यांना विद्यापीठाची पीएचडी पदवी

 प्रा.कुंडलिक गुंड यांना विद्यापीठाची पीएचडी पदवी 


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीचे रहिवासी व सध्या बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा.कुंडलिक ज्ञानदेव गुंड यांना सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची इंग्रजी विषयातून पीएचडीची पदवी प्राप्त झाली आहे.

प्रा.कुंडलिक गुंड हे मागील 25 वर्षांपासून इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत. आजतागायत त्यांचे इंग्रजी विषयाच्या विभागीय व राज्य पातळीवर शोधपत्रिका प्रसिद्ध झाल्या असून विविध ठिकाणच्या सेमिनारमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.इंग्रजी विषयाचे हाडाचे व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.इंग्रजी विषय जरी अवघड व कठिण वाटत असला तरी ते विद्यार्थ्यांना सहज सोप्या भाषेत हसतखेळत व आनंददायी पद्धतीने शिकवतात.त्यांनी "A Critical Analysis of the Male Characters in the Selected Novels of Anita Brookner" या विषयावर संशोधन करून विद्यापीठाकडे शोधनिबंध सादर केला होता त्यास विद्यापीठ व तज्ञ मार्गदर्शकांच्या कमिटीने मंजुरी देऊन त्यांना पीएचडीची पदवी प्राप्त झाली आहे.त्यांना बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयाचे प्रा.डॉ.वैभव वाघमारे यांचे मार्गदर्शन व वाशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम व प्राध्यापक मित्रमंडळी,बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विष्णू वाघमारे,सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांच्यासह अनेकांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.ते विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक  राजेंद्र गुंड सर,नारायण गुंड सर,प्राथमिक शिक्षक गणेश गुंड यांचे चुलत बंधू आहेत. विठ्ठलवाडी येथील गुंड परिवार हा सुशिक्षित,सुसंस्कृत आणि शासकीय नोकरदारांचा आहे.यानिमित्ताने गुंड परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्रा.कुंडलिक गुंड यांचा वाशी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक स्टाफ आणि शिक्षक मित्रमंडळी व नातेवाईकांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages