शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेल्या मंगळवेढा किल्ल्यात 'इको फ्रेंडली क्लब'ची ऐतिहासिक सहल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेल्या मंगळवेढा किल्ल्यात 'इको फ्रेंडली क्लब'ची ऐतिहासिक सहल

 शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेल्या मंगळवेढा किल्ल्यात 'इको फ्रेंडली क्लब'ची ऐतिहासिक सहल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पर्यावरण आणि वारसा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्या वतीने यंदाची शिवजयंती अतिशय आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. ज्या भूमीवर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे सात दिवस वास्तव्य लाभले, त्या ऐतिहासिक मंगळवेढा भुईकोट किल्ल्याची सफर इको फ्रेंडली क्लबने घडवून आणली.

सन 1665 च्या विजापूर मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी मंगळवेढा किल्ल्यात सात दिवस मुक्काम केला होता. या ऐतिहासिक घटनेची साक्ष देणाऱ्या किल्ल्याची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या विशेष सहलीमध्ये सहभागी शिवभक्तांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी संपूर्ण किल्ला परिसर दणाणून सोडला होता.

इतिहास अभ्यासक प्रकाश मुळीक यांनी यावेळी उपस्थित सदस्यांना मंगळवेढा किल्ल्याचे महत्त्व आणि महाराजांच्या वास्तव्याचा सविस्तर इतिहास सांगितला.

शिवभक्तांनी मंगळवेढा किल्ल्यासोबतच संत दामाजी मंदिर, श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिर आणि माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर या पर्यटन स्थळांनाही भेटी देऊन दर्शन घेतले.

या उपक्रमाचे आयोजन इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे, समन्वयक अजित कोकणे आणि संतोष तडवळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या ऐतिहासिक सफरीत गिरीश घोगले, उमा घोगले, योगिता चाबुकस्वार, अस्मी चाबुकस्वार, गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, आराध्या कोकणे, डॉ. सिद्धार्थ तळभंडारे, विजय राठोड, चंद्रशेखर गुंजले, शशिकला गायकवाड, प्रणाली कडगंची, गणेश लोणी, ऋषिकेश जावळे आदी सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages