महाराष्ट्र ही वीरांची शूर परिक्रमाची भूमी आहे- प्रा विकास शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 21, 2026

महाराष्ट्र ही वीरांची शूर परिक्रमाची भूमी आहे- प्रा विकास शिंदे

 महाराष्ट्र ही वीरांची शूर परिक्रमाची भूमी आहे- प्रा विकास शिंदे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र ही वीरांची शूर पराक्रमाची भूमी आहे आणि या मातीतच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जन्मले ही गौरवास्पद बाब आहे. असे मत प्रा विकास शिंदे यांनी मांडले. ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज अध्यासन केंद्र व छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने विशेष व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
 पुढे बोलताना ते म्हणाले की शिवचरित्रातून आपण सर्वांनी धाडस शूरवीर हे गुण आत्मसात केले पाहिजे. सतराव्या शतकात महाराष्ट्राची परिस्थिती ही अतिशय हालाखीची होती 1630 ला महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ होता अशा अवस्थेतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या परिस्थितीत महाराष्ट्राला नेतृत्वाची गरज होती. आणि त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अटकेपार झेंडा रोवला. स्वराज्याचे तोरण बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाभावाचे मावळे गोळा केले व त्यांच्या सहकार्याने त्यांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेट रोवण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे घाम गाळला तिथे त्यांच्या विश्वासू मावळ्यांनी आपले रक्त सांडले हे आपण शिवचरित्रातून घ्यावी अशी मत मांडले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याचे पूजन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मोटे यांनी केले. प्रमुख पाहुण्याच्या परिचय प्रा.युवराज सुरवसे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.सोनकांबळे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे, ज्ञानेश्वर सपाटे, प्रा कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, प्रा वीरभद्र दंडे, प्रा अनिल घनवट, प्रा सचिन गायकवाड, प्रा नेताजी कोकाटे, महेश माने, शिवदास चटके,अशोक चव्हाण, नागनाथ नवगिरे, प्राचार्य मधुकर पवार,  दत्ता भोसले, सुजाता जुगदार,मंजुश्री पाटील, उषा गोखळे, माधवी कांबळे, शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages