Hot Posts

6/recent/ticker-posts

महापौर व आयुक्तांची सिद्धेश्वर मंदिर तलावाची पाहणी

 महापौर व आयुक्तांची सिद्धेश्वर मंदिर तलावाची पाहणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर मंदिर तलावामध्ये अलीकडेच मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याची घटना घडली होती या घटनेची गंभीर दखल घेत  महापौर विनायक कोंड्याल व महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या सह श्री सिद्धेश्वर देवस्थान चे चेअरमन धर्मराज काडादी यांनी आज महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तसेच सिद्धेश्वर मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी तलावातील पाण्याची स्थिती, मृत मासे, स्वच्छता उपाययोजना आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्राथमिक तपासणीत तलावातील पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे (Dissolved Oxygen - DO) प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेकडून पुढील उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत येणार आहे.पाण्याचे नमुने संकलन व प्रयोगशाळा तपासणी करणार असून तलावातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले असून ते सखोल तांत्रिक व रासायनिक विश्लेषणासाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती अतिरिक्त कार्यवाही करण्यात येणार आहे. एअरेटर कारंजे सुरू करण्यात आले आहे.
पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त विद्यमाने तातडीने ८ एअरेटर कारंजे (Aeration Fountains) सुरू करण्यात आली आहेत. या माध्यमातून पाण्यात हवा मिसळून विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी, सेंद्रिय घटकांचे विघटन वेगाने करण्यासाठी आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी बायोरेमिडिएशन (Bioremediation) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, “सिद्धेश्वर तलाव हे सोलापूर शहराचे श्रद्धास्थान व नैसर्गिक वैभव आहे. तलावातील जलचरांचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे.  भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील.”आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, “तलावातील पाण्याची गुणवत्ता सातत्याने तपासली जाईल. आवश्यक असल्यास अतिरिक्त एअरेशन यंत्रणा व इतर तांत्रिक उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांनी तलाव परिसरात कचरा टाकू नये व प्रदूषण टाळण्यासाठी सहकार्य करावे. तलावाचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्यासाठी व पर्यावरणीय संतुलन जपण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आले.यावेळी मनीषा मगर (सहा आयुक्त),व्यंकटेश चौबे (सार्वजनिक आरोग्य अभियंता)राजेश परदेशी (विद्युत विभाग प्रमुख)अजितकुमार खानसोळे (कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी) अक्षय मोरे (पर्यावरण अधिकारी) स्वप्नील सोलंकर (उद्यान विभाग)श्रीनिवास गुजरे (सार्वजनिक बांधकाम विभाग) भूषण देशपांडे (वॉटर सेफ्टी सल्लागार भारत सरकार) आदी मन्यावर उपस्थिती होते.

Reactions

Post a Comment

0 Comments