जनतेच्या सहकार्याने विकासाची वाट अधिक गतिमान करण्याचा संकल्प- संस्कृती सातपुते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

जनतेच्या सहकार्याने विकासाची वाट अधिक गतिमान करण्याचा संकल्प- संस्कृती सातपुते

 जनतेच्या सहकार्याने विकासाची वाट अधिक गतिमान करण्याचा संकल्प- संस्कृती सातपुते




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या या कामांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अधिक सुविधा उपलब्ध होणार आसुन.सुरक्षितता व सोयीसुविधांमध्ये निश्चितच भर पडणार आसुन जनतेच्या सहकार्याने विकासाची ही वाट अधिक गतिमान करण्याचा संकल्प  सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजपाच्या नूतन जिल्हा परिषद सदस्या संस्कृती सातपुते यांनी ग्रामस्थांसमोर व्यक्त केला.
                                त्या जनसुविधा योजनेंतर्गत विकासकामाचे भूमिपूजन व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.संस्कृती सातपुते पुढे बोलत असताना म्हणाले की,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दहिगाव जिल्हा परिषद गटातील डोंबाळवाडी येथील मतदारांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. 
यावेळी  सोलापूर जिल्हा परिषद सदस्या संस्कृती सातपुते, मा.जि.प.सदस्या ऋतुजा ताई मोरे, माळशिरस पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय शेळके, भाजपा नातेपुते शहर अध्यक्ष राजेंद्र पांढरे, गणेश रुपनवर पाटील, महादेव केसकर हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिनपुरी रोड ते आत्माराम रुपनवर वस्ती रस्ता या जनसुविधा योजनेंतर्गत विकासकामाचे भूमिपूजन व आमदार रामभाऊ सातपुते साहेबांच्या प्रयत्नांतून नव्याने उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण जि.प. सदस्या संस्कृती सातपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी डोंबाळवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages