Hot Posts

6/recent/ticker-posts

लांबोटी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाची उत्साहात सांगता

 लांबोटी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाची उत्साहात सांगता

शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या वतीने मूर्ती पूजन, मान्यवरांचा सत्कार व बालमावळ्यांचे पोवाडे






मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- लांबोटी ता. मोहोळ येथील लांबोटी गावात शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हॉटेल जयशंकरचे मालक रुद्राक्ष खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून श्रीरंग लाळे सर, संत निरंकारी मंडळाचे मोहोळ मुखी नामदेवजी काळे महाराज, मायाप्पा जाधव गुरुजी, हॉटेल जय शंकरचे मालक रुद्राक्ष खताळ, हॉटेल सुनीलचे मालक प्रेम वाघमोडे, उपसरपंच नितीनजी चंदनशिवे, जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब मोरे, दादा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास जाधव, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची उपस्थिती लाभली.


याशिवाय बलवंत घोरपडे, रघु चट्टे, कुमार चट्टे, समाधान व्यवहारे, गणेश चट्टे, शंकर चट्टे, मोहन दाजी खताळ, उमेश देवकर, मधुकर होनमाने, विलास शिंदे महाराज, रमेश वाघमारे, सचिन शिंदे, संतोष रूपणर, रामा शिंदे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव समितीचे अध्यक्ष अविराज चट्टे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


कार्यक्रमादरम्यान सर्व प्रमुख मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत युवकांनी त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करावे, असे आवाहन केले.


कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते बालमावळ्यांचे सादरीकरण. सुमारे ४० बालमावळ्यांनी पोवाडे, देशभक्तीपर गीत आणि शिवचरित्रावरील भाषणे सादर केली. लहान वयातही इतिहासाची जाण आणि शिवचरित्रावरील अभ्यासपूर्ण मांडणी पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.


बालमावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रभावीपणे मांडली. या माध्यमातून नव्या पिढीत इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा मंडळाचा प्रयत्न यशस्वी ठरला.


कार्यक्रमाच्या शेवटी आमर जाधव यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला.


लांबोटी गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, युवकांच्या सक्रिय सहभागामुळे सामाजिक ऐक्य व सांस्कृतिक जपणुकीला चालना मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments