तालुकास्तरीय वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धेत बबनराव शिंदे विद्यालयाचे यश ‌. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 28, 2026

तालुकास्तरीय वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धेत बबनराव शिंदे विद्यालयाचे यश ‌.

तालुकास्तरीय वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धेत बबनराव शिंदे विद्यालयाचे यश ‌.



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
राजमुद्रा प्रतिष्ठान वडशिवणे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा , निबंध आणि हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये अकोले खुर्द तालुका माढा येथील बबनराव शिंदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत यश मिळवले आहे .
            यामध्ये मोठ्या गटातील प्रथम स्वराली घाडगे ,द्वितीय संस्कृती मोरे , तृतीय श्रेया देवकर तर मध्यम गटात प्रथम धनलक्षमी नलवडे , द्वितीय ज्ञानेश्वरी डोके , तृतीय आदित्य नलवडे तर लहान गटात श्रावणी श्रीराम हिने प्रथम क्रमांक पटकावला तर हस्ताक्षर स्पर्धेत अनुष्का मोरे हिने प्रथम क्रमांक तर ऋतुजा लेंडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला.  
      तालुकास्तरीय वकृत्य व निबंध स्पर्धा लहान गट (इ 1 ली ते 5)
विषय : 1) माझी आई, 2) छत्रपती शिवाजी महाराज 3) सावित्रीबाई फुले, 4) आदर्श माता जिजाऊ
मध्यम गट (ह 6 वी ते 8 वी)
 विषयः 1) माझे वडील, 2) आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज, 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 4) संघर्ष परिस्थितीशी
मोठा गट (ह 9 वी ते 12 वी)
विषय : 1) राजे पुन्हा जन्माला या, 2) गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, 3) मोबाईलचे दुष्परिणाम
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा लहान गट (इ 1 ली ते इ 5 वी  राष्ट्रगीत जन-गण-मन
मध्यम गट (इ 6 वी इ ते 8) भारताचे संविधान प्रस्ताविका
मोठा गट (इ 9 वी ते इ 12)  पसायदान असे विषय ठेवण्यात आले होते .
     या स्पर्धेसाठी राजमुद्रा प्रतिष्ठान  मंडळाचे अध्यक्ष सुहास कोडलिंगे, सचिव रेवण टकले, उत्सव समितीचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण,उपाध्यक्ष हनुमंत माने, खजिनदार लक्ष्मण माने, मंडळाचे सभासद शुक्राचार्य सावंत,सुनील कवडे गणेश जगदाळे ,भुजंग तोरस्कर, महेश जगदाळे ,प्रवीण टकले, रोहित तोरस्कर, श्रीकांत पन्हाळकर, सोमनाथ टकले ,तेजस साळुंखे, विवेक सरडे, औदुंबर अंधारे ,शनिदेव वनवे, बापूसाहेब भंडारे यांनी परिश्रम घेतले .
या स्पर्धेसाठी साईनाथ देवकर नागनाथ मोरे , रमेश कोडलिंगे, भैरवनाथ उघडे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. 
  यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांनी अभिनंदन केले आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages