नर्सिंग व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांचा शपथविधी व दीपप्रज्वलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित, विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, अकलूज. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील बी.एस्सी. नर्सिंग, जी.एन.एम. व ए.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी, दीपप्रज्वलन व शपथविधी समारंभाचे आयोजन, शनिवारी ३१ जानेवारी २०२६ रोजी, शंकरराव मोहिते-पाटील स्मृतिभवन, शंकरनगर, अकलूज येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. श्रीलेखा राजेश, डीन, फॅकल्टी ऑफ नर्सिंग, एम.यू.एच.एस, नाशिक या उपस्थित होत्या. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील खासदार, माढा मतदारसंघ,सौ. शीतलदेवी मोहिते-पाटील अध्यक्ष, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज, कु. ईशिता धैर्यशील मोहिते-पाटील चेअरमन, शिवरत्न स्पोर्टस अकॅडेमी अकलूज, धर्मराज दगडे सचिव शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज, डॉ. एम.के. इनामदार अश्विनी हॉस्पिटल, डॉ. निवांत हराळे दिशा हॉस्पिटल,सी.डी.सी. चेअरमन पराग गायकवाड आणि सी.डी.सी. मेंबर नितीन जोशी , प्रशासकीय अधिकारी अशरफ शेख, उपजिल्हा रूग्णालय अकलूज येथील सौ. सुरेखा भालेराव, सौ. अनिता एकंडे, कु. तेजस्विनी ऐवळे तसेच शिवरत्न नालेज सिटी मधील सर्व प्राचार्य व उपप्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात फोटो पूजन व स्वागत गीताने करण्यात आली तर दीपप्रज्वलन करून, नर्सिंग व्यवसायातील सेवाभाव, करुणा व जबाबदारीचे प्रतीक अधोरेखित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नर्सिंग शपथ घेत रुग्णसेवेची निष्ठेने जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास विविध शासकीय व खासगी रुग्णालयांचे संचालक व मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. शैक्षणिक गुणवत्तेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी रँकर्सचा सत्कार करण्यात आला.
डॉ. श्रीलेखा राजेश व डॉ. एम.के. इनामदार या मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सेवा, शिस्त व मानवतेच्या मूल्यांवर कार्य करण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सौ. मेरी सुमती व उपप्राचार्य प्रा. डॉ. शिवतीर्थय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. रंजना कांबळे यांनी केले. व महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्चना साळवी व व्याख्याता सौ. प्रज्ञा महाळगी यांनी केले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment