डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंचकडून गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंच, सोलापूर यांच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कथित मनुवादी भूमिकेचा जाहीर निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच वन अधिकारी जाधव ताई यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही अन्यायकारक कारवाई करण्यात येऊ नये, यासाठीही स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले. जर जाधव ताई यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या वेळी मंचचे अध्यक्ष ॲड. शताब्दीकुमार मधुकर दोडयानुर, ज्येष्ठ सदस्य ॲड. संजीव सदाफुले, अजय रणशृंगारे, उपाध्यक्ष विक्रम वाघमारे, कार्याध्यक्ष रविराज सरवदे, सचिव दीपक हुलसुरे, प्रथम गायकवाड, ॲड. राहुल गायकवाड, ॲड. जयप्रकाश भंडारे, ॲड. राजरत्न बनसोडे, ॲड. सत्यजित वाघमारे, ॲड. विशाल मस्के, राज दोडयानुर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
.png)
0 Comments