सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्रभाग क्रमांक ७ सह संपूर्ण शहरात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. रविवारी पालकमंत्री गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत प्रभाग ७ मध्ये हजारो नागरिकांच्या सहभागात भव्य पदयात्रा काढण्यात आली.
पद्माकर काळे, उत्तरा बरडे बचुटे, श्रद्धा पवार आणि आनंद कोलारकर यांनीही नागरिकांना भेट देत भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. पदयात्रा प्रभाग ७ मधील पत्रा तालीम, सळई मारुती, पंजाब तालीम, थोरला मंगळवेढा तालीम, चौपाड, शिंदे चौक, नवजवान गल्ली, लोणार गल्ली, काळी मशीद, दाते बोळ, बाबा कादरी मशीद, बाजी अण्णा मठ या परिसरातून काढण्यात आली.
यावेळी पुरुषोत्तम बरडे, निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे, दत्तात्रय कोलारकर, अमर दुधाळ, सचिन शिंदे, बजरंग जाधव, देविदास बनसोडे, सुरज बंडगर, जयवंत सलगर, काटकर, महेश बोकन, सतीश कुदळे, शेखर फंड, सतीश प्रधाने, विनोद मोटे, बाबू बनसोडे, दादा सुरवसे, धीरज बावधनकर आदी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.
पदयात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रभाग ७ मधील भाजप उमेदवारांच्या विजयाची शक्यता अधिक स्पष्ट होत असल्याचे दिसून आले.
0 Comments