सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्रभाग क्रमांक ६ मधील अपक्ष उमेदवार माजी महापौर मनोहर सपाटे, कीर्ती सचिन शिंदे, अंकुश राठोड आणि रेखा लहू गायकवाड यांच्या प्रचारार्थ थोबडे वस्ती, देगाव, पावन गणपती, देशमुख पाटील वस्ती आदी ठिकाणी भव्य जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले.
सभेत सपाटेंनी डॉ. आंबेडकरांच्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी मतदारांनी जागरूक राहून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्षाकडून आपल्याला सहकार्य मिळत असून, शिवसैनिक व कार्यकर्ते सक्रियपणे प्रचारात सहभागी होत आहेत. “या परिसरात बदल घडवून आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा ठाम निर्धारही सपाटेंनी व्यक्त केला.
सभेला लहू गायकवाड, बॉबी शिंदे, अतिश म्हेत्रे, दत्ता भोसले, सोनल भोसले, दत्ता खलाटी, नागेश रुपनर, नागनाथ पवार, श्याम गांगर्डे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments