सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा संकल्प भाजपने केला असून, शहराला समृद्ध करण्यासाठी सोलापूरची जनता भाजपसोबत ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी साईबाबा चौक येथे आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी भाजपच्या विकासात्मक धोरणांवर प्रकाश टाकत मतदारांना योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले. सोलापूरकरांनी भूलथापांना बळी न पडता आपले अमूल्य मत विकासासाठी सत्कारणी लावावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सभेला शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे यांनी संबोधित करताना, आमदार झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात शहर मध्य विधानसभेसाठी १४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती दिली. हा निधी रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरी सोयींसाठी वापरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेच्या व्यासपीठावर प्रभाग क्रमांक १२ मधील उमेदवार विनायक कोंड्याल, सिद्धेश्वर कमटम, सारिका खजुरगी, अर्चना वडनाल तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवार सुनिता कामाठी, सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा उपस्थित होते. याशिवाय स्थायी समितीचे माजी सभापती राजमहिंद्र कमटम, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, भाजप उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, सुनील दाते, सुरेश तमशेट्टी, दत्ता पाटील, शंकर चौगुले, दिनेश घोडके, महादेव घोडके, जनार्दन येमुल, अरुण साळुंखे, शिवाजी साळुंखे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रभाग १२ व १३ मध्ये भाजपच्या उमेदवारांना वाढता जनाधार मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
0 Comments