प्रभाग ६ मधील नगरसेवकांकडून आमदार आणि नेत्यांविषयी कृतज्ञता, मानले आभार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले. पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. भाजपच्या या चारही उमेदवारांच्या विजयात महत्त्वपूर्ण असे योगदान दिल्याबद्दल पॅनल प्रमुख गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी
दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि माजी आमदार व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने व पाणी वेस तालीमचे संस्थापक चंद्रकांत वानकर यांना भेटून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मनिष देशमुख, नगरसेवक प्रथमेश कोठे,दत्तात्रय वानकर, विठ्ठल वानकर, महादेव गवळी, हेमंत पिंगळे, अर्जुन गायकवाड, भीमा गायकवाड, समर्थ वानकर,विजय वानकर, जीवन माने आदी उपस्थित होते.
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आहे.सोलापूर शहराच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून लढवलेल्या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. निवडणुकीच्या कालावधीत प्रचारादरम्यान जनतेला विकास कामासंदर्भात दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे नवीन नूतन नगरसेवकांना शुभेच्छा देताना आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवून घराघरात भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचविणार असल्याचे पॅनल प्रमुख नगरसेवक गणेश वानकर यांनी सांगितले.
यावेळी आमदार महोदय यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना भावी वाटचालीस शुभेच्छा देताना प्रभागाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

0 Comments