सौ. मल्लम्मा चप्पळगाव "सावित्री- फातिमा गुणवंत शिक्षक पुरस्काराने" सन्मानित
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यांना खंबीरपणे साथ देऊन त्यांच्या या 'महन्मय' कार्यात शिक्षकाची भुमिका निभावून खुप मोठे योगदान देणाऱ्या देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून गणल्या जाणाऱ्या फातिमा शेख यांच्या संयुक्त नांवाने दिला जाणारा व शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी " हे ध्येय ठेवून महाराष्ट्र स्तरावर कार्य करणाऱ्या शिक्षक भारती या संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा जिल्हास्तरीय पुरस्कार हन्नूर येथील अनंत चैतन्य प्रशालेच्या कार्यकुशल सहशिक्षिका व सांस्कृतिक कार्यक्रम विभाग सहाय्यिका सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांना " सावित्री- फातिमा गुणवंत शिक्षक पुरस्काराने " सन्मानित करण्यात आले. फेटा, शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र " असे या पुरस्काराचे स्वरूप होते. जुळे सोलापूर येथील " जगदीशश्री लॉन्स ॲन्ड हॉल "मध्ये पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, माजी शिक्षक आमदार कपिल पाटील, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित काटमोरे यांच्या हस्ते सौ.मल्लम्मा चप्पळगाव यांना गौरवण्यात आले. यावेळी या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य व वेगवेगळ्या जिल्हा,तालुका स्तरावर शिक्षक भारती संघटनेचे कार्य करणारे अनेक पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे, जेष्ठ शिक्षक सरदार मत्तेखाने, अप्पासाहेब काळे,शहाजी माने व समस्त शिक्षक बंधू- भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी ,पती काशीनाथ चप्पळगाव उपस्थित होते.आपल्या प्रशालेतील सकारात्मक दृष्टीकोन बाळगून हिरीरीने काम करणाऱ्या एका सहशिक्षेकेला हा बहुमान प्राप्त झाल्याने महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी,संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक मा.श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी,हन्नूर प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, सी. ई.ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी अभिनंदन केले.
.png)
0 Comments