विमल खताळ, उमेश पाटील, सचिन जाधव, चरणराज चवरे, नितीन निळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मोहोळ तालुक्यातील राजकारणाला आला वेग
कुरूल (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये कामती जि. प. गटातून विमलताई खताळ, कुरुल जि. प. गटातून उमेश पाटील, सचिन जाधव, पेनुर जि.प. गटातून चरणराज चवरे, पोखरापूर जि. प. गटातून सर्जेराव निळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मोहोळ तालुक्यातील राजकारणाला वेग आला आहे.
मोहोळ तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांची निवडणूक लागली असून मंगळवारी जिल्हा परिषद गटासाठी १७ उमेदवारांनी तर पंचायत समिती गणासाठी २८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवार पर्यंत एकूण जिल्हा परिषदेसाठी २९ तर पंचायत समितीसाठी ३३ अर्ज असे एकूण ६२ अर्ज दाखल झाले होते. आमदार राजू खरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कुरुल जि. प.गटातून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी पेनुर जि.प.गटातून त्याचबरोबर पोखरापूर जि. प. गटातून नितीन निळे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे, नगरसेवक रमेश बारसकर आदींसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच कुरुल गटातून जकराया साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी भाजपामधून कार्यकर्त्यांसह वाजत गाजत शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी जालिंदर लांडे, राहुल जाधव, माऊली जाधव आदी उपस्थित होते.आष्टी जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून समाधान शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
चौकट-
पोखरापूर जिल्हा परिषद गट बालाजी नरुटे भाजप सर्जेराव निळे, नाना निळे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), देविदास शेंडगे उद्धव ठाकरे (शिवसेना), नरखेड गट लक्ष्मण मगर (काँग्रेस), कुरुल गट अंकुश जगताप, हनुमंत पाटील (भाजपा), आष्टी गट राजेंद्र सर्जे (काँग्रेस), अजय डोंगरे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), समाधान शेळके, बाळासो पाटील (भाजपा), लालासाहेब पाटील (अपक्ष) तसेच पोखरापूर पंचायत समिती गणासाठी समाधान खंदारे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), अतुल मोरे (काँग्रेस) बाबासाहेब गाडे, आदिनाथ कांबळे (भाजपा),सय्यद वरवडे प. स. गणातुन राहुल मोरे (भाजपा), बाळासाहेब गायकवाड, विजय कोकाटे, संग्राम काकडे
(शरद पवार रा. काँ.), सुरेश शिवपूजे (काँग्रेस), चांगुना म्हाळनोर (राष्ट्रीय समाज पक्ष)शिरापूर सो. प.स.गणातून नीलम मसलकर (भाजपा) सायली चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), टाकळी सिकंदर गणातून सुवर्णा सोनटक्के स्वाती गवळी (शिवसेना) अमोरीका कापसे (भाजपा), पेनुर गणातून संगीता वसेकर शिवसेना वर्षाराणी वसेकर, अंजली आढेगावकर (भाजपा), घोडेश्वर गणातून संजय विभुते (राष्ट्रवादी काँग्रेस), सुलेमान तांबोळी (काँग्रेस) पांडुरंग सरवळे हनुमंत पाटील (भाजप) पृथ्वीराज पवार महेश जाधव (शरदचंद्र पवार रा. काँ.)खंडाळी प.स. गणातून सतीश भोसले, अजित भोसले (भाजपा) आष्टी गणातून जयराम गुंड (भाजपा) आदींनी उमेदवारी दाखल केली.
.png)
.png)
0 Comments