Hot Posts

6/recent/ticker-posts

जेलरोड पोलिसांची कारवाई; तडीपार आरोपींकडून चोरीचे १११ मोबाईल जप्त

 जेलरोड पोलिसांची कारवाई; तडीपार आरोपींकडून चोरीचे १११ मोबाईल जप्त




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रभावी कारवाई करत तडीपार आरोपींकडून चोरी केलेले एकूण १११ मोबाईल जप्त केले असून त्यांची एकूण किंमत १३ लाख ५२ हजार ९९८ रुपये इतकी आहे. जानेवारी २०२६ मध्ये जेलरोड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते.
पोलीस उपआयुक्त विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या आदेशानुसार तपास सुरू असताना १७ जानेवारी २०२६ रोजी गुप्त बातमीच्या आधारे इक्बाल मैदान परिसरात सापळा रचून फारुक महमद हनिफ पठाण (वय ४२, रा. शहापूर चाळ, सोलापूर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तडीपार आरोपी गणेश उर्फ आप्पा बैरुणगी व लखन बैरुणगी यांनी विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी करून विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली.
या कारवाईमुळे जेलरोड पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले असून ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments