Hot Posts

6/recent/ticker-posts

काका साठे यांचा बीबीदारफळ गटातून अर्ज दाखल

 काका साठे यांचा बीबीदारफळ गटातून अर्ज दाखल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते काका साठे हे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
आपला पारंपारिक नान्नज जिल्हा परिषद गट सोडून ते आता पहिल्यांदाच बीबीदारफळ या जिल्हा परिषद गटातून उभे राहत आहेत.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी काका साठे यांनी बीबी दारफळ या जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कोणताही गाजावाजा त्यांनी केला नाही.
सोबत सुवर्णा झाडे, माजी उपसभापती जितेंद्र शीलवंत, माजी तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, अन्नू मार्तंडे, प्रकाश चोरेकर, कुमार नवगिरे, दीपक अंधारे, सुभाष शिंदे, लिंबाजी लामकाने, बापू शिंदे, प्रकाश गुरव, मोहन लांबतुरे यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद नान्नज गटासाठी अनिल माळी यांनी अर्ज दाखल केला आहे. वडाळा पंचायत समितीसाठी वैशाली शीलवंत, मार्डी अनुसूचित जाती गणासाठी काजल संजय गायकवाड जगताप अंबिका लामकाने बीबीदारफळ पंचायत समिती गणासाठी यांनी अर्ज दाखल केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments