Hot Posts

6/recent/ticker-posts

कालवा विकास कामांसाठी ७० कोटींचा निध

 कालवा विकास कामांसाठी ७० कोटींचा निधी



सांगोला (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर न्याय मिळाला आहे. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत प्रलंबित असलेल्या पाइपलाईन आणि कालवा विकास कामांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मंजूर निधीतून बुद्धेहाळ भरण  विकास कामांसाठी २१ कोटी २७ लाख ६८ हजार असे एकूण सुमारे ७० कोटींचा महत्त्वाचा निधी सांगोला तालुक्यातील सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांनी प्रापण सूची सन २०२५ - २६ मध्ये समाविष्ट करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावानुसार निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीद्वारे बांधकाम व पाइपलाईन टप्प्यांची कामे करण्यात येणार आहेत. यापूर्वी या कामांच्या मंजुरी प्रस्तावांना वारंवार विलंब होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आमदार देशमुख यांनी ही मागणी ठामपणे  केला.

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सांगोला कालवा कि.मी. १ ते ५० परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार वाढीव पाईपलाईन व लाभक्षेत्र विकास कामांच्या संदर्भात सुमारे ७० कोटींचा महत्त्वाचा निधी सांगोला परिसरातील सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. या कामांमुळे कडलास, कोळे, सोनंद, गौडवाडी तसेच परिसरातील इतर गावांना नियमित सिंचन मिळून शेतीचे क्षेत्र आणि उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होऊन  कालव्यांच्या विस्तारीकरणामुळे केवळ शेतीपुरतेच नव्हे, तर पिकांची उत्पादन क्षमताही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.. शेतकऱ्यांच्या पाणी अभावी उभ्या राहिलेल्या अनेक समस्यांना यामुळे मोठा हातभार लागणार आहे.

सांगोला तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पासाठी तब्बल ७० कोटींचा निधी मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे शेतकरी बांधवांकडून अभिनंदन होत आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन पाणी प्रश्नाला दिलासा मिळवून देण्यासाठी त्यांनी दाखवलेली बांधिलकी व प्रामाणिक भूमिका कौतुकास्पद अज्ञेश्र. त्यांच्या प्रयत्नांमुळे कालवा व पाइपलाईन कामांना गती मिळून मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्राला लाभ होणार आहे.

शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवणे
ही आमची बांधिलकी आहे. मंजूर झालेल्या निधीमुळे अपूर्ण कामांना नवसंजीवनी मिळेल आणि सिंचन व्यवस्थेला गती मिळणार आहे.
- डॉ. बाबासाहेब देशमुख
आमदार, सांगोला



Reactions

Post a Comment

0 Comments