सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी गायकवाड तर उपाध्यक्षपदी सुरवसे यांची एकमताने निवड
२०२६ ते २०२९ या कालावधीसाठी बिनविरोध कार्यकारी मंडळ जाहीर; ग्रंथालय चळवळीला नवे बळ
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्ह्यातील वाचनसंस्कृती, ग्रंथालय चळवळ आणि ज्ञानप्रसाराला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी पंढरपूर येथील ज्येष्ठ शिक्षक, समाजसेवक व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते ज्योतीराम (जे. बी.) गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी करण्यात आली असून संपूर्ण कार्यकारी मंडळाची निवड बिनविरोध पार पडली. ही निवड प्रक्रिया सलोख्याच्या व शांततापूर्ण वातावरणात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मधूकर भगरे यांनी काम पाहिले, तर लवाद म्हणून सौ. वैशाली मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत अध्यक्ष ज्योतीराम (जे.बी.) गायकवाड, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाह साहेबराव शिंदे, सहकार्यवाह भास्कर कुंभार व खजिनदार सौ. सारिका माडीकर या पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आल्या.
तसेच जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालकपदी
ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, हरिदास रणदिवे, जयंत आराध्ये, गुलाबराव पाटील, ग्रंथमित्र विजयकुमार पवार, अॅड. अनिल पाटील, शैलशिल्पा जाधव, अमोगसिद्ध कोळी, प्रमोद बेरे, विनोद गायकवाड, सारिका मोरे, धोंडीबा बंडगर, प्रकाश शिंदे, सोमनाथ खडतरे, विलास कदम आणि सुप्रिया किरनाळे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा ग्रंथालय चळवळीचा इतिहास, आजवर झालेली वाटचाल आणि भविष्यातील उद्दिष्टे त्यांनी आपल्या भाषणातून मांडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनसर शेख यांनी मानले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रंथालयप्रेमी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये सौ. वृषाली हजारे, सौ. दिपाली नरखेडकर, सौ. मेघा मिसाळ, मच्छिंद्र लेंडवे, शौकत पटेल, रवी गाजरे, तानाजी जाधव, एकनाथ गुरव, सुरेश शिंदे, मदणे, महाराज भोसले हरि, दिलीप भोसले, संजय चव्हाण, नाना धांडूरे, गाडेकर, सुधाकर घाडगे, बाळासाहेब शिंदे, मल्लिकार्जुन एलमार, अनिल कुचेकर, पाटील सर, गोफणे सर, झांबरे सर, बामणे सर यांच्यासह अनेक ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना ज्योतीराम गायकवाड यांनी सर्व पदाधिकारी, संचालक व उपस्थितांचे आभार मानले. “जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रंथालय सक्षम करणे, ग्रामीण व शहरी भागात वाचनसंस्कृती वाढवणे, युवक व विद्यार्थ्यांना ग्रंथालयाकडे आकर्षित करणे आणि बंद पडलेली ग्रंथालये पुन्हा कार्यान्वित करणे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गायकवाड सर हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रंथालय चळवळीत सक्रिय असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय संघ अधिक प्रभावीपणे कार्य करेल, वाचनसंस्कृतीला चालना मिळेल आणि ज्ञानप्रसाराचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

0 Comments