सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्रभाग क्रमांक १४ मधून समाजवादी पक्षाचे उमेदवार राजा बागवान निवडणूक लढवत असून, रविवारी समाजवादी पार्टीची भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत प्रभागातील जनसागर उपस्थित होता, तर विशेषतः महिलांचा मोठा सहभाग नोंदवला गेला.
पदयात्रा खराडी कॉम्प्लेक्स, किडवाई चौक, मजदूर क्लब, राहुल गांधी झोपडपट्टी, जिंदशाह मदार चौक, जेलरोड, तेलंगी पाच्छा पेठ, भारतीय चौक, शनिवार पेठ, विजापूर वेस, सिद्धेश्वर पेठ आणि जिल्हा परिषद चौक मार्गे पार पडली. प्रभागातील नागरिकांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी माहिती दिली की, समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश येथील खासदार सनातन पांडे सोमवारी रियाज खरादी व राजा बागवान यांच्या प्रचारार्थ सोलापूरात येणार आहेत. सायंकाळी ७ वाजता किडवाई चौकात त्यांची जाहीर सभा होईल.
0 Comments