भाजपचा बालेकिल्ला कायम – मनीष देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- प्रभाग क्रमांक १९ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी भव्य पदयात्रा काढण्यात आली. बसवराज केंगनाळकर, व्यंकटेश कोंडी, सौ. कविता हिरालाल गज्जम व कलावती गंगदे यांच्या नेतृत्वाखाली आकाशवाणी केंद्र आणि जगदंबा नगर येथून भाजपा युवा नेते मनीष देशमुख यांच्या उपस्थितीत पदयात्रेला प्रारंभ झाला.
पदयात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. पदयात्रा आकाशवाणी परिसर, थोबड़े चौक, गंगा चौक, इंदिरा चौक, आडम प्लॉट, देसाई नगर, जमादार वस्ती, नीलम नगर, शरणमठ आणि मार्कंडेय चौक मार्गे पार पडली.
यावेळी मनीष देशमुख यांनी प्रभाग १९ हा भाजपचा बालेकिल्ला असून तो अबाधित राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. आमदार सुभाष देशमुख यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून अनेक मूलभूत सुविधा मार्गी लावल्यामुळे भाजपच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.
0 Comments