पापय्या तालीम संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- २६ जानेवारी २०२६ रोजी पापय्या तालीम संघाच्यावतीने जुनी मिल कंपौड येथील ऐतिहासिक वारसा पापय्या तालीमच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन भव्य व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे चंडक प्रशालेचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह व संस्थेचे माजी उपाध्यक्ष मा.श्री.जयंत मोरे सर यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, सेक्रेटरी शिवाजी चटके, सह सेक्रेटरी विजय पाटील, खजिनदार प्रकाश सुरवसे, वस्ताद वसंत कुलकर्णी, सदस्य गजानन लामकाने, किरण बायस, प्रकाश पवार, बंडू कदम यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी सुरेश जानकर, कृष्णा जोशी, अमोल जाधव, अतुल कोथींबीरे, संजय हिरळीकर, कन्हैय्या मुक्ता, श्रीनिवास कोटा, रणजीत खताळ, जालिंदर काटकर, संभाजी मळगे, बबन झिंगाडे, सागर शिंदे, अजय रणवे, प्रकाश जाधव, महेश पवार, साहिल नरळे, यश नागणे, संतोष अंजिखाने, यश डांगे, सिध्देश्वर आयवळे, रविकांत जाधवआदी सभासद व्यायामपटू व क्रीडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विजय पाटील व सुत्रसंचालन गणेश कुलकर्णी यांनी केले तदनंतर पाहुण्यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली.
0 Comments