पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने सबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून
बुधवारी पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच शिवसेनेकडून सर्व कार्यक्रम रद्द करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे राज्यातील महत्त्वाचे नेते होते. सडेतोड देहबोली आणि जातीपातीचा विचार न करता काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
आजचा दिवस हा काळा दिवस असून देशातील नागरिकांच्या मनाला चटका लावणारा दिवस ठरला असल्याचे सांगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांना अश्रू आणावर झाले होते.
यावेळी अनेकांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी टाकळीचे माजी सरपंच संजय साठे, आरपीआयचे नेते आप्पासाहेब जाधव, शिवसेना टाकळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दीपक चंदनशिवे, राष्ट्रवादीचे खर्डी गणाचे उमेदवार शत्रुघन रणदिवे, शिवसेनेच्या टाकळी गणाच्या उमेदवार रोहिणी साठे, सूर्यकांत भोसले, माणिक सय्यद यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpeg)
0 Comments