Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात आघाडी

 प्रभाग ४ मध्ये राष्ट्रवादीची प्रचारात आघाडी

‘यंदा बदल हवा’चा नारा; सीए सुशील बंदपट्टे ठरतायत मतदारांची पहिली पसंती
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विशेषतः सुविद्य, उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले सीए सुशील बंदपट्टे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभागात निम्मी लढाई आधीच जिंकली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रचारादरम्यान प्रभागातील गल्लीबोळातून, बैठका व मतदारांच्या गाठीभेटींमधून “यंदा बदल हवा” हा सूर सातत्याने उमटत असून, सुशिक्षित आणि विकासाभिमुख प्रतिनिधीची गरज नागरिक ठळकपणे व्यक्त करत आहेत. “आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर सुशिक्षित, उच्चविद्याविभूषीत आणि प्रामाणिक उमेदवाराची निवड आवश्यक आहे. त्या निकषांवर सीए सुशील बंदपट्टे हेच योग्य उमेदवार आहेत,” अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, महानगरपालिकेसारख्या संस्थेत अर्थकारण, नियोजन, प्रशासन आणि विकासकामांचा सखोल अभ्यास असलेले प्रतिनिधी असणे गरजेचे आहे. सीए सुशील बंदपट्टे यांच्यासारखा अभ्यासू आणि कामाचा अनुभव असलेला उमेदवार मिळाल्याने प्रभागाच्या विकासाला निश्चित दिशा मिळेल, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभागातील जनतेच्या अपेक्षा ओळखून मनातला उमेदवार दिला असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. आता घड्याळासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याची जबाबदारी मतदारांची आहे, असे आवाहन प्रचारादरम्यान करण्यात येत आहे.
यावेळी प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार अ. कविता चंदनशिवे, ब. सीए सुशील बंदपट्टे, क. सारिकताई फुटाणे व ड. विश्वनाथ बिडवे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. प्रचार फेऱ्यांमधून महायुतीची संघटनात्मक ताकद आणि मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद स्पष्टपणे दिसून येत आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ४ मध्ये बदलाच्या अपेक्षेने मतदार सुशिक्षित नेतृत्वाकडे झुकत असल्याचे चित्र असून, येत्या मतदानात त्याचा थेट परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments