ज्येष्ठांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार यांच्या उपक्रमांतर्गत सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC) तथा प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (RRTC)मुंबई व सोलापूतील ज्येष्ठ नागरिक संघांची शिखर समिती यांचे संयुक्त विद्यमाने 26, 27, 28 डिसेंबर 2025 असे तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी, आदित्य नगर सांस्कृतिक सभागृह विजापूर रोड, येथे 'ज्येष्ठ नागरिकांचे आहार व पोषण'
या विषयावर पार पडलेल्या कार्यशाळेसाठी आहारतज्ञ तस्लिम चौधरी, देविका डोंगरेकर आदी तज्ञांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी, दमाणी ब्लड बँक डफरिन चौक, येथे 'डिजिटल साक्षरता' विषयावर सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, प्रा. डॉ. प्रसन्न माधवराव गव्हाणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, शिल्प निदेशक संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक विजय भांगे, संगणक अभियंता- सायबर तज्ञ अविनाश पाटील, कॉन्स्टेबल अश्विनी लोणी. इ. मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर रविवार दि. 28 डिसेंबर 2025 रोजीच्या अखेरच्या कर्णिक नगर - एकता नगर येथील सत्रात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुरेश गायकवाड, मानसोपचार तज्ञ डॉ. निहार दिलीप बुर्ट, समाजसेविका डॉ. अपर्णा सुभाष कल्याणकर या मान्यवरांनी 'ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य आणि मालमतेचे संरक्षण' या विषयावर सखोल माहिती दिली.
कार्यशाळा समारोपाच्या या शेवटच्या दिवशी सक्रिय योगदान देणाऱ्या ज्येष्ठांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात पाच जणांना ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव व पाच जणांना ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांची नावे.. सौ.सुलभा दातार, मरगू जाधव, निलकंठप्पा कोनापुरे, जयकुमार काटवे, मन्मथ कोनापुरे, शंकरराव करजगी, गुरुलिंग कन्नूरकर, सिध्दाराम गोविंदे, दत्ता निवृत्ती भोसले,कृष्णात देवकर यांचा समावेश आहे.
सदर कार्यशाळेस भरभरून प्रतिसाद मिळाला.
शिबिरातून बरीच अत्यावश्यक माहिती उपलब्ध झाली असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.
पहिल्या दिवशीच्या सत्राचे प्रास्तविक शिखर समितीचे अध्यक्ष प्रा. विलास मोरे यांनी, दुसऱ्या दिवशी मुख्य समन्वयक गुरुलिंग कन्नुरकर यांनी तर तिसऱ्या दिवशीचे कोषाध्यक्ष प्रा. कृष्णात देवकर यांनी, तसेच मान्यवरांचे स्वागत शिखर समितीचे सचिव मन्मथ कोनापुरे, बाळासाहेब पाटील व चन्नय्या स्वामी यांनी केले त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशीच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट्ये प्रकल्प समन्वयिका निलिमा येतकर यांनी विषद केली.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि ज्येष्ठांचा उदंड प्रतिसाद यामुळे ही कार्यशाळा कमालीची यशस्वी ठरली.

0 Comments