प्रभाग ४ मधील बेरोजगार तरुण व महिलांसाठी उद्योग उभारणार – सी.ए. सुशील बंदपट्टे
महानगरपालिकेत आर्थिक शिस्त व स्थैर्य येणार – मतदारांचा ठाम विश्वास
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सुशील चंदू बंदपट्टे यांना प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक प्रशासन आणि नियोजनबद्ध कारभार ही त्यांची ठळक ओळख असून, नगरसेवक म्हणून निवडून आल्यास महानगरपालिकेच्या कामकाजात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल, असा ठाम विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
सुशासन, उत्तम प्रशासन व कारभारात अनुशासन म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह, अशी भावना नागरिकांमध्ये दृढ होत आहे. “आपला माणूस” म्हणून सी.ए. सुशील बंदपट्टे यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांच्या व्यावसायिक अनुभवाचा थेट लाभ प्रभागाच्या व शहराच्या विकासासाठी होणार असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा उल्लेख करत सांगितले की, “माझ्या सहीपेक्षा सी.ए.च्या सहीला जास्त किंमत आहे”, हे विधान सी.ए. सुशील बंदपट्टे यांच्या कार्यक्षमतेचे व विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसेल आणि विकासकामे शिस्तबद्ध पद्धतीने मार्गी लागतील, अशी अपेक्षा मतदारांमधून व्यक्त होत आहे.
सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी आपल्या प्रचारात प्रभागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कुटीर उद्योग व स्वयंरोजगाराचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभे करणे, तसेच मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बदलत्या काळानुसार विकासाचा वेग वाढवण्यासाठी सक्षम, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज असून, तो विश्वास आज प्रत्येक मतदाराच्या डोळ्यांत दिसून येत असल्याचे चित्र आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवार कविता आनंद चंदनशिवे, सी.ए. सुशील चंदू बंदपट्टे, सारिका विवेक फुटाणे व विश्वनाथ दत्तात्रय बिडवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहानांचे प्रेम, थोरांचे आशीर्वाद आणि समाजासाठी काम करण्याची प्रबळ इच्छा हीच आपली खरी पुंजी असल्याचे सांगत, या बळावर विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
प्रत्येक मत महत्त्वाचे असून, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा निर्धार युतीच्या उमेदवारांनी केला आहे. “एकच विचार, एकच दिशा – राष्ट्रवादीच्या घड्याळावरच विश्वास” अशी भावना सध्या संपूर्ण प्रभागात दिसून येत आहे.
चौकट १
“सेवा, शिक्षण आणि संवेदनशीलतेच्या जोरावर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणार” – सी.ए. सुशील बंदपट्टे
सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचे स्पष्ट व्हिजन मांडले. आर्थिक शिस्तीच्या माध्यमातून पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
चौकट २
सेवा आणि माणुसकीचा वसा जपणारे नेतृत्व – विश्वनाथ दत्तात्रय बिडवे
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणारे, सेवाभावी वृत्तीचे व जनतेच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणारे नेतृत्व म्हणून विश्वनाथ बिडवे यांची ओळख आहे.
चौकट ३
सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या सारिका विवेक फुटाणे
फुटाणे कुटुंबात सून म्हणून प्रवेश केल्यानंतर सारिका फुटाणे यांनी केवळ वारसा जपला नाही, तर महिलांना एकत्र आणून त्यांना सामाजिक व उद्योगशील बनवण्याचे प्रभावी कार्य केले आहे.
चौकट ४
सामाजिक जाणिवेचे, सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तिमत्व – कविता आनंद चंदनशिवे
कविता चंदनशिवे या सामाजिक भान जपणाऱ्या, शिक्षित व संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात असून, महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.


0 Comments