Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पालखी व सातही नंदी ध्वजांचे विधिवत पूजन

 श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पालखी व सातही नंदी ध्वजांचे विधिवत पूजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. सचिन ओम्बासे यांनी आयुक्त निवसास्थान येथे सहपत्नी परिवारसह श्रद्धापूर्वक श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पालखीचे तसेच सातही नंदी ध्वजांचे विधिवत पूजन केले. पारंपरिक विधी, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात हा पूजन सोहळा पार पडला.श्री सिद्धेश्वर महायात्रा ही सोलापूर शहराची सांस्कृतिक व धार्मिक ओळख असून या यात्रेच्या माध्यमातून शहरात भक्तीभाव, एकोपा व परंपरेचा वारसा जपला जातो. या पार्श्वभूमीवर महायात्रा शांततेत, सुरक्षिततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी सोलापूर महानगरपालिकेमार्फत व्यापक तयारी करण्यात आली आहे.या पूजन प्रसंगी अस्मिता ओम्बासे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, ईशानी ओम्बासे, आनय ओम्बासे, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, जय प्रकाश आमनगी यांच्यासह मान्यवर अधिकारी उपस्थित होते.यावेळी मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी श्री सिद्धेश्वर महायात्रा ही सोलापूरच्या अस्मितेचा अविभाज्य भाग असून यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य व सुरक्षा व्यवस्था यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून महायात्रा यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.या पूजनाने श्री सिद्धेश्वर महायात्रेची भक्तिमय सुरुवात झाली असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments