श्री विठ्ठल कारखान्याचे वतीने कै. अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रध्दांजली
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांचे आज सकाळी ९.४६ वाजता विमान अपघातामध्ये दुदैवी निधन झाले. कै. अजितदादा पवार यांना श्री विठ्ठल कारखान्याचे वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करणेत आली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी कै.अजितदादा पवार यांचे विषयी शोक व्यक्त करताना म्हणाले की, महाराष्ट्रासाठी आजचा दिवस काळा दिवस म्हणून कायम स्मरणात राहिल. दादा हे स्पष्टवक्ता व निर्भीड असे व्यक्तीमत्व होते. ते एक धुरंधर व अभ्यासू राजकारणी होते. त्यांचे जाण्याचे कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांचे कुटुंबीय व महाराष्ट्रातील सर्व जनतेला दुःख सहन करणेची ईश्वर शक्ती देवो व त्यांचे आत्म्यास चिरशांती लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करणेत आली.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री धनंजय काळे, वर्क्स मॅनेजर यु.के.तावरे, केन मॅनेजर ए.डी.वाघ, चिफ केमिस्ट बी. आर. माने, फायनान्स मॅनेजर एन. बी. शिंदे, चिफ अकौंटंट ओ.एस. शिंदे, डिस्टीलरी मॅनेजर एन. एस. सोळंके, लेबर अॅण्ड वेल्फेअर ऑफिसर बी.एस.पाटील, मुख्य शेती अधिकारी ए. व्ही. गुळमकर, परचेस ऑफिसर ए. एस. ऐनापुरे, कारखान्याचे जेष्ठ सभासद हणमंत पाटील यांचेसह कारखान्याचे सभासद, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments