Hot Posts

6/recent/ticker-posts

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

 वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

                             - सहा. पोलीस अधीक्षक डगळे


 

         पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- माघ शुद्ध एकादशी २९ जानेवारी २०२६ रोजी असूनया माघ यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहा. पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत डगळे यांनी दिली.
        माघ वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असूनसुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार ३८६ पोलीस अधिकारी व कर्मचारी होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ०२पोलीस उपअधिक्षक१७ पोलीस निरिक्षिक७९ सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक६८८ पोलीस कर्मचारी व ६००  होमगार्ड तसेच आरसीपी, क्युआरटीबीडीएस पथकेकार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
       वारी कालावधीत  गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  नदीपात्रभक्ती सागर (६५ एकर)महाव्दारमहाव्दार घाटपत्राशेड  यासह आदी  ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात  आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉड स्थापन करण्यात आले असूनयामध्ये वारकरी व नागरिकांच्या  वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच ड्रोन द्वारे व १६२ सीसीटीव्ही कॅमेरॅच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवले जाणार आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.
              वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी १० गामा पेट्रोलिंग व ९ ठिकाणी  डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर  खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर १३ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहाकार्य करावे असेआवाहनही सहा. पोलीस अधीक्षक श्री. डगळे यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments