Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने 500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला - चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी

 श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने 500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला - चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील सहकार क्षेत्रात अत्यंत नावाजलेली पतसंस्था म्हणून ज्याचे नाव घेतले जाते शिवाय महाराष्ट्र शासनाचे सहकारनिष्ठ पुरस्कार मिळवलेले श्री चौडेश्वरी  तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने आपला एकूण 500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याचे चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी सांगितले.

जोडभावी पेठ कन्ना चौक येथील तोगटवीर क्षत्रीय नागरी पतसंस्थेने एकूण 500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम उपस्थित होते.

व्यवसाय उद्दिष्ट पूर्तीचे सर्व श्रेय ज्यांनी आमच्या संस्थेत अत्यंत विश्वासाने ठेवी ठेवल्या अशा ठेवीदार, खातेदार आणि कर्जदार अशा ग्राहकांना जातो.

संस्थेचे संपत्ती स्थिती मजबूत असून सोलापूर शहरातील ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. एकूण ठेवी 262 कोटी असून कर्जे 238 कोटी इतकी झालेली आहे. आणि यामध्ये जास्तीत जास्त सोने तारण कर्ज असून ग्राहकांनी सोने तारण कर्ज मिळविण्यासाठी अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे इथे नमूद करावे लागेल. तसेच आमच्या संस्थेचे खेळते भांडवल 312 कोटी इतकी आहे. 

महाराष्ट्र शासन दरबारी अनेक वेळा आमच्या पतसंस्थेची दखल घेतली गेली असून व्यवसायाचे अनेक पुरस्कार आमच्या संस्थेला मिळाले असल्याचे चेअरमन यांनी सांगितले. 

संस्थेच्या प्रगतीत शाखा अधिकारी कर्मचारी आणि संचालक मंडळाचा मोठा वाटा आहे. संचालक मंडळ कोणतेही मानधन न घेता कोणते कर्ज न घेता कर्जाला जामीन न राहता येथे सेवा बजावीत असतो. त्यामुळे संस्थेचा एनपीए नेहमी झिरो आहे आणि तशी काळजी घेतली जाते. 

या कार्यक्रमाचे प्रस्तावना चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी केले तर तर आभार व्हाईस चेअरमन विलास बडगंची यांनी मानले. तर सूत्रसंचालन मुख्य व्यवस्थापक राजेंद्र उदगीरी यांनी केले.

यावेळी संस्थापक रामचंद्र पूडूर, अरुण चिंता, रामकृष्ण उदगिरी, डॉ. नारायण रंगम विद्यमान संचालक मंडळ विठ्ठल बडगंची, अरविंद पुडूर, विष्णू म्याकल,मोहन खंडे,  नरेंद्र बत्तूल, मल्लिकार्जुन खंडे, अजय रंगम, चंद्रकांत रंगम, अंबिका उदगिरी, विजयकुमार शिंपी, रूपसिंग राठोड, भगवंत फलमारे , ॲड. अंबादास कंदीकोंडा सर्व माजी संचालक तसेच व्यवस्थापक, उपव्यवस्थापक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments