Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रह्मांड कट्टयावर प्रजासत्ताक दिनी वक्तृत्व स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धाचे आयोजन यशस्वी संपन्न झाले

 ब्रह्मांड कट्टयावर प्रजासत्ताक दिनी वक्तृत्व स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धाचे आयोजन यशस्वी संपन्न झाले







ठाणे (कटूसत्य वृत्त):- ब्रह्मांडकर रहिवाशी कै. डॉ. उत्तमराव लक्ष्मणराव पात्रे यांच्या स्मृतीदिना निमित्त त्यांचे चिरंजीव हेमंत पात्रे व सामाजिक संस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारा ब्रह्मांड कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन व कै. डॉ. उत्तमराव लक्ष्मणराव पात्रे यांचा स्मृतीदिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत “देश माझा मी देशाचा”  “वंदे मातरम” या घोषणेचा अर्थ तसेच स्वातंत्र्य लढ्यातील स्त्री पुरुषांचे योगदान या सारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार मांडले आणि वेशभूषा स्पर्धेत स्वातंत्र सैनिक, समाजसुधारक आणि राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या थोर व्यक्तींची रूपे विद्यार्थ्यांनी सादर केली उदाहरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई फुले व कावेरीताई पाटील यांची रूपे सादर केली. ह्या स्पर्धा मो. ह. विद्यालय, ठाणे येथे आयोजित केले होते. 
      वक्तृत्व स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होती व वेशभूषा स्पर्धा इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होती, या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती जया राव व कार्यक्रमाचे अध्यक्ष ठा.म.पा.चे छत्रपती शिवाजीमहाराज हॉस्पिटल कळवा ठाणे. सेवानिवृत्त डिन डॉ. भीमराव जाधव आणि विशेष पाहुणे म्हणून श्रावण पाटील व विलास सावंत हे पत्रकार उपस्थित होते.
     स्पर्धेच्या सुरवातीला डॉ. प्रतिक्षा बोर्डे यांनी स्पर्धे बद्दल माहिती दिली. व स्पर्धेचे नियम सांगितले आणि विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रा. प्रज्ञा पंडित व डॉ. प्रतिक्षा बोर्डे तर वेशभूषा स्पर्धेसाठी पंकज पाडाळे व सावनकुमार सुपे हे परीक्षक लाभले होते.
     वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपला देश भारताप्रती आदरपूर्वक व भारतीयांशी आपुलकीची भावना असावी, प्रत्येक भारतीय नागरिकाने आपले देशाप्रती सन्मान, प्रेम व आदर व्यक्त करावा आणखी भारत देशाचा उदय कसा होईल ह्या करिता प्रयत्नशील रहावे, आपल्या देशाचे रक्षण कसे होईल या दृष्टीने तन-मन व धनाने कर्तव्य बजावले पाहिजे. आपल्या राष्ट्रासाठी महापुरुषांचे योगदान किती महत्त्वाचे होते ह्या बद्दल विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी राष्ट्रासाठी योगदान दिलेल्या महापुरुषांचे रूप धारण केले होते व त्यांची माहिती सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला.
       या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांनी उपदेशात्मक व प्रोत्साहनात्मक भाषण दिले. भाषणात शिक्षणाला, संस्कृतीला महत्व दिल्या गेले त्याचप्रमाणे मोबाईलचा उपयोग वाईट गोष्टी साठी न वापरता चांगल्या, योग्य व आवश्यक कामासाठी जरूर उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन केले.
     वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहा विजय कोरे, द्वितीय क्रमांक वज्रेश्वरी सुभाष बन व तृतीय क्रमांक आस्था नित्यानंद जोशी तसेच उत्तेजनार्थ बक्षीस मधुर घनश्याम गांगुर्डे यांना देण्यात आले त्याच प्रमाणे वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांगी हनुमंत पवार ने सावित्रीबाई फुलेंचा वेश धारण केला होता द्वितीय क्रमांक आरव स्नेहल आर्ते नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वेष धारण केला होता व तृतीय क्रमांक ईशिता हेमंत पाटील ने राजमाता जिजाऊंचा वेष धारण केला होता तसेच उत्तेजनार्थ बक्षीस संस्कृती आनंद चव्हाण ने कावेरीताई पाटील यांचा वेष धारण केला होता. विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, व वयम मासिक देऊन गौरविण्यात आले त्याचप्रमाणे इतर सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गावखडकर यांनी केले, डॉ. प्रतीक्षा बोर्डे, राजेश जाधव व राजेंद्र गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले. संयोजक म्हणून डॉ. प्रतिक्षा बोर्डे, राजेंद्र गोसावी व स्नेहल जोशी यांनी उत्कृष्टपणे जवाबदारी पार पाडली. ब्रह्मांड कट्टयाचे महेश जोशी, वर्षा गंद्रे, प्रल्हाद माघाडे, यशस्वी आपटे व हेमंत पात्रे कुटुंब उपस्थित होते.
       स्पर्धेच्या निमित्ताने मुलांना आपल्या देशाचे ऐतिहासिक व्यक्तींची ओळख होण्याची उत्तम संधी मिळाली, स्पर्धेचे आयोजन अतिशय उत्साहपूर्ण आणि सुनियोजित होते, देशभक्तिची भावना जागृत करणारे हे कार्यक्रम खूपच प्रभावी ठरले असे मत स्पर्धेला आलेल्या पालकांनी व्यक्त केले.
Reactions

Post a Comment

0 Comments