शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा
उपमुख्यमंत्री शिंदेंचे मतदारांना व लाडक्या बहिणींना आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी सोलापूर शहरातील मतदार व विशेषतः लाडक्या बहिणींना उद्देशून शिवसेना व राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून विकासाची गती अधिक वेगाने पुढे न्यावी, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना ही नेहमीच सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी पक्ष आहे. महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे, रोजगारनिर्मिती तसेच मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शिवसेनेने सातत्याने काम केले आहे. या कामांची पावती म्हणून मतदारांनी धनुष्यबाण चिन्हाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लाडक्या बहिणींसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, शिवसेनेच्या माध्यमातून महिला, युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, प्रामाणिक व लोकाभिमुख प्रतिनिधींची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व रोजगार या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आली असून, आगामी काळातही ही विकासाची घोडदौड कायम राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
शेवटी त्यांनी सोलापूरच्या सर्व मतदारांना आवाहन करत सांगितले की, “धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नसून, ते जनतेच्या विश्वासाचे व विकासाच्या दिशेचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.”

0 Comments