राजराजेश्वरी शिक्षण संकुलाचे स्नेहसंमेलन उत्साहात
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला.या स्नेहसंमेलनात बालवाडी ते नववीपर्यंतच्या ५१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते . संस्था खजिनदार ललिता कुंभार यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले.सेवानिवृत मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, ज्ञानेश्वर म्हेत्रे,प्राचार्य रविशंकर कुंभार , पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी शिवहर गाढवे, सचिन पवार, शितल पवार, रूपाली कुंभार, नंदिनी कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी ,विश्वराध्य मठपती आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यानी गणेश गीत,एकटी एकटी,गोरा कुंभार, मोबाईल थीम, कोळी गीत, ब्रह्म कलसा कोतारा, फॅमिली सॉंग,ढोला डा,राणु मुंबई, नाटक,यल्लम्मा, सुंदरी सुंदरी, ऑपरेशन सिंदूर, मराठी रिमिक्स,बिलीव्हर्स, शेतकरी गीत, मंगळागौर ,आया रे तुफान,गाडी घुंगराची, लावणी ,जय थळपती रिमिक्स आदी गीतांवर नृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. निवेदन उज्ज्वला भांड व संगीता नरगिडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुतीराव कांबळे यांनी केले तर हनुमंत कुरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बजरंग शिरसाट , लक्ष्मण कांबळे ,वैशाली गुजर, मल्लिकार्जुन बिराजदार, अमोल गुड्डेवाडी, शितल चमके, श्रेयस बिराजदार, सुजाता फुलारी, रविकांत पोतदार, विशाल खाडे, किरण साळुंखे, महेंद्र वाघमारे, चंद्रकांत पाटील, भाग्यश्री महाजन, वंदना तेली, शारदा गिनानी, आशाराणी गायकवाड, गौरी रेके, मंजुश्री धुमशेट्टी, सागर स्वामी,शिवानंद गवसने, नागेश कळंत्रे गुरुबाळाया स्वामी, विश्वनाथ उंबर्गीकर, सचिन होटगे, मंगल स्वामी, गीता चौगुले आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments