Hot Posts

6/recent/ticker-posts

मेव्हण्याचा खून केल्याप्रकरणी कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर- ॲड. रितेश थोबडे

 मेव्हण्याचा खून केल्याप्रकरणी कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर- ॲड. रितेश थोबडे





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागेश संतोष विटकर वय -20, रा- सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी अभिषेक अंबादास बंदपट्टे वय – 23, रा- सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, मयत नागेश हा आरोपी अभिषेक चा मेव्हणा होता. मयत नागेश याने अभिषेक याची सासू अनिता हिस अभिषेक यास दारूचे व्यसन आहे, जुगार व मटका खेळतो, बाईचे लफडे करतो असे खोटे सांगितले होते. त्यामुळे अभिषेक व त्याच्या पत्नीमध्ये भांडण झाले होते. दिनांक 12/3/2025 रोजी आठ वाजेच्या सुमारास तो घरी असताना त्याला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो बाहेर गेला होता. साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास फिर्यादी हिची जाऊ प्रियंका विटकर हिने सांगितले की, तिच्या घरासमोर नागेश यास अभिषेक बंदपट्टे व अविनाश बंदपट्टे हे लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आहेत, त्यावेळी फिर्यादी लिंबूबाई ही तेथे गेली असता, मयत नागेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता व आरोपी अभिषेक व अविनाश हे तिस पाहून गाडीवर बसून पळून गेले. त्यानंतर नागेश यास उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता, तो मयत झाला. अशा आशयाची फिर्याद मयताची आई लिंबूबाई संतोष विटकर हिने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावर आरोपीस अटक झाली होती.
आपणास जामीन मिळवा म्हणून आरोपी अभिषेक याने जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता .त्यावर आरोपी अभिषेक याने एडवोकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत जामीन मिळणेसाठी कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात सक्रतर्शनी खुनाचा गुन्हा दिसून येत नाही, असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी 15,000 /- रुपयांच्या जातमुचलक्यावर अर्जदार/आरोपीस जामीन मंजूर केला.

Reactions

Post a Comment

0 Comments