Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू

 जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखणे, तसेच विशेषतः रजोनिवृत्ती कालावधीमध्ये महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक व संप्रेरक बदलांवर योग्यवेळी वैद्यकीय उपचार, तपासणी व समुपदेशन उपलब्ध देण्याकरिता मकरसंक्रांतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाच्या निर्देशनानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये व ग्रामीण रुग्णालय येथे रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्यात आले असल्याचीमाहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी सांगितली.

साधारण ४५ ते ५५ या वयात महिलांचे मासिक पाळी कायमची बंद होते, यालाच मेनोपॉज अथवा रजोनिवृत्ती म्हणतात. पण, या काळात शरीरात अनेक बदल होतात व त्या बदलांना सक्षमपणे सामोरे जाणे गरजेचे असते.

त्या अनुषंगाने दर बुधवारी विशेष मेनोपॉज ओपीडी सुरू करण्यात आली असून त्याचा फायदा जिल्ह्यातील रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांना होणार आहे.या सुविधा मिळणारमेनोपॉज दरम्यान गरम झटके, घाम येणे, झोप न लागणे, मूड बदल, चिडचिड, नैराश्य, वजन वाढ, सांधेदुखी आदी आजार होऊ शकतात. क्लिनिकमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ व इतर तज्ज्ञ डॉक्टर या समस्या समजून घेऊन योग्य उपचार देतात. हाडांची झीज टाळता येते.

इस्ट्रोजेन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात. फॅक्चरचा धोका वाढतो. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आदी तपासण्या, योग्य व्यायाम सल्ला मिळतो. हृदयविकार व मधुमेहाचा धोका कमी करता येतो. बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो. नियमित तपासणी, उपचार व आहार जीवनशैली मार्गदर्शन मिळते.

Reactions

Post a Comment

0 Comments