सोलापूरात प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेला ७२३.२७ कोटींचे उत्पन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये (डिसेंबर २०२५ पर्यंत) प्रवासी वाहतूक आणि प्रवासी भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे.
वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेत सुरक्षित, किफायतशीर व विश्वासार्ह सेवा देण्याच्या दिशेने मध्य रेल्वेची कामगिरी महत्त्वाची ठरत आहे.
मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात (डिसेंबर २०२५ पर्यंत) प्रवासी भाड्यातून एकूण ५,८८१.०८ कोटीकार्यक्षम प्रवास सुविधा देण्यासाठी कटिबद्धडिसेंबर २०२५ मध्ये प्रवासी भाड्यातून मिळालेले एकूण उत्पन्न ७२३.२७कोटी रुपये इतके असून, यामध्ये उपनगरीय सेवांमधून ८७.५८ कोटी रुपये व उपनगरी सेवांव्यतिरिक्त सेवांमधून ६३५.६९ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
गेल्या वर्षीच्या याच महिन्यात हे उत्पन्न ६०४.४० कोटी रुपये होते. यामध्ये सुमारे २० टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना सुरक्षित, किफायतशीर, विश्वासार्ह आणि कार्यक्षम प्रवास सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत हे उत्पन्न ५,५७०.३३ कोटी रुपये होते. यामध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे.उपनगरीय सेवांमधून या आर्थिक वर्षात (डिसेंबर २०२५ पर्यंत) ७५७.१२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत हे उत्पन्न ७२१.७० कोटी रुपये होते.
यामध्ये सुमारे ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, उपनगरी सेवांव्यतिरिक्त (हेमू, मेमू मेल व एक्प्रेस) प्रवासी वाहतुकीतून ५,१२३.९६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षी हे उत्पन्न ४,८४८.६३ कोटी रुपये होते. या उत्पन्नातही ५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रवासी संख्येच्या कबाबतीतही मध्य रेल्वेने उल्लेखनीय वाढ साध्य केली आहे. या आर्थिक वर्षात (डिसेंबर २०२५ पर्यंत) एकूण १,२२७दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करण्यात आली असून, गेल्या वर्षी ही संख्या १,२०२ दशलक्ष होती.
यामध्ये २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामध्ये १,०७३ दशलक्ष उपनगरीय प्रवासी असून, मागील वर्षी ही संख्या १,०५८ दशलक्ष होती. उपनगरी सेवांव्यतिरिक्त (डेमू/मेमू/मेल/एक्सप्रेस) प्रवाशांची संख्या यावर्षी १५४ दशलक्ष असून, गेल्या वर्षी ती १४४ दशलक्ष होती. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२५ या एकाच महिन्यात मध्य रेल्वेने १४२ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. यामध्ये १२४ दशलक्ष उपनगरीय व १८ दशलक्ष उपनगरी सेवांव्यतिरिक्त प्रवासी समाविष्ट होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ही संख्या १३८ दशलक्ष होती, ज्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

0 Comments