बंजारा समाजाचा प्रभाग ६ मधील भाजपच्या उमेदवारांना एकमुखी जाहीर पाठिंबा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपचे उमेदवार पॅनल प्रमुख गणेश वानकर,सुनील खटके,सोनाली गायकवाड व मृण्मयी गवळी यांनी प्रभागातील शेवटच्या जनतेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. सोमवारी सायंकाळी बसवेश्वर नगरातील सेवालाल मंदिरासमोरील पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेप्रसंगी हजारो बंजारा समाजबांधवांनी विकासाच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेत भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.
बंजारा समाज बांधवांच्यावतीने भाजप उमेदवारांवर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून उमेदवारांचे जंगी स्वागत केले. जय सेवालाल,भरतील जनता पार्टीचा विजय असो,पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है,देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बंजारा समाजासाठी वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी,ठिकठिकाणी अंतर्गत रस्ते,ड्रेनेज लाईन तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी हि अत्यंत महत्वाची कामे केली आहेत. उर्वरित विकास कामेसुद्धा आपणच पूर्णत्वास नेणार आहोत,असे सांगत बंजारा समाजबांधवानी सत्ताधारी भाजपसोबत राहण्याचे आवाहन पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी भैय्या राठोड,नाईक राजू राठोड,नाईक गणेश पवार,नाईक राजू पवार,नाईक रमेश राठोड,कारभारी मनोहर पवार,प्रेम राठोड,संजय राठोड,चव्हाण,सुरेश पवार,लाला पवार,रवी चव्हाण,प्रकाश राठोड,अक्षय सावकार,लेखन राठोड,किरण चव्हाण,जनाबाई राठोड,ताराबाई राठोड,बसू रासेराव यांच्यासह बंजारा समाजातील प्रतिष्ठित नागरिक व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 Comments