आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार – सुशील बंदपट्टे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-प्रभाग क्रमांक ४ मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून, निवडून आल्यानंतर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सर्वप्रथम आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार सुशील बंदपट्टे यांनी केले.
प्रभागातील चाटे गल्ली येथे आयोजित पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी उमेदवार कविता आनंद चंदनशिवे, सारिका फुटाणे, विश्वनाथ बिडवे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षत्रीय गल्ली, मीठ गल्ली, कामाठी गल्ली, मथला मारुती परिसर, बाळीवेस, बुधवार पेठ आदी भागांत पदयात्रा व होम टू होम प्रचार करण्यात आला. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
प्रभागातील पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शाळा व इतर नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

0 Comments