Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी समन्वयाने काम करावे-आयुक्त डॉ. ओम्बासे

 मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी समन्वयाने काम करावे-आयुक्त डॉ. ओम्बासे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत येणाऱ्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणा, मनुष्यबळ, साहित्य, तांत्रिक सुविधा तसेच सुरक्षा व व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदान केंद्रांवरील सोयी-सुविधा, ईव्हीएम यंत्रांची उपलब्धता व हाताळणी, मतमोजणी केंद्रांची तयारी, वीज, पाणी, वाहतूक, सुरक्षा व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांवरही भर देण्यात आला.
यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व नियोजनबद्धरीत्या पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या स्पष्ट सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण करावे तसेच कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतदान व मतमोजणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही आयुक्तांनी नमूद केले.सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, प्र मुख्यलेखा परीक्षक सदानंद वाघमारे, सह. नगर रचना मनिष भीष्णूरकर, सह. आयुक्त गिरीष पंडित, सह आयुक्त शशिकांत भोसले, सह आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका आकुलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी अग्निशमन प्रमुख राकेश साळूंखे,संबंधित विभागीय अधिकारी तसेच विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments