प्रभाग २२ मध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत
किसन जाधव पॅनलचा महाशक्तीप्रदर्शन रोडशो
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नटगिरी, अंबिका नागेश गायकवाड व चैत्राली गायकवाड यांच्या प्रचारार्थ काढलेला भव्य रोडशो म्हणजे जणू विजयाचा गुलाल उधळणारी विजयदर्शी पदयात्राच ठरली. रामवाडी शासकीय गोदामापासून सोनी नगर, रेवणसिद्धेश्वर नगर, विजापूर नाका मार्गे रामवाडी मुख्य रस्त्यापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत हजारो महिलांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि अवघा परिसर भगवामय झाला. या शक्तीप्रदर्शनात पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजप युवा नेते मनीष देशमुख व मोनिका देवेंद्र कोठे यांची उपस्थिती विशेष ठरली. विकास म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे विकास. प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी देत किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या पाठीशी भाजप सरकार खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. आमदार देवेंद्र कोठे यांनीही जाधव पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. किसन जाधव म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाग २२ साठी भरघोस निधी मंजूर केला असून पालकमंत्री गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास आता थांबणार नाही. मोनिका कोठे यांनी या पदयात्रेला प्रत्यक्ष विजययात्रा संबोधले.
लक्ष्मण मामा जाधव व माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रोडशोला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, विशेषतः महिलांची विक्रमी उपस्थिती, शहरातील इतर कोणत्याही प्रभागात न पाहिलेला असल्याची चर्चा आहे. यावरून किसन जाधव व नागेश गायकवाड यांचे वर्चस्व स्पष्ट होत असून भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
.jpg)
.jpg)
0 Comments