Hot Posts

6/recent/ticker-posts

जनतेच्या मनातील नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण प्रभाग 26 मध्ये चमत्कार घडवणार

 जनतेच्या मनातील नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण प्रभाग 26 मध्ये चमत्कार घडवणार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नगरसेवकांची कामे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा महापालिका सदस्य म्हणून आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे, विकास कामाचा पाठपुरावा करणे, रस्ते,पाणी,स्वच्छता,पथदिवे,ड्रेनेजची समस्याची निराकारण करणे, निसर्गाची आपत्ती आल्यानंतर सोलापूर महानगरपालिके कडील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा राबवून प्राधान्याने ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता समक्ष उभे राहून नागरिकांसाठी धावून जाणे हे सर्व गुण माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्या अंगी आहेत. म्हणूनच सर्वसामान्य जनता त्यांना जनतेच्या मनातील नगरसेविका म्हणून ओळखतात व एक कॉल.. प्रॉब्लेम सॉल.. याची प्रचिती प्रत्यक्ष अनुभवली आहे.

कोरोना काळात लोक बाहेर पडत नव्हते परंतु नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण हे लोकांच्या मदतीला धावून गेलेले आहेत अनेक गरजू लोकांना कोरोना पासून संरक्षणासाठी लागणारे मास्क,सॅनिटायझर, व कोरोना काळात समक्ष उभे राहून निर्जंतुक फवारणी करून नागरिकांना दिलासा देत होते तसेच. गजू लोकांना अन्नदान जसे की.. गहू,तांदूळ,तेल, चहापत्ती, साखर,साबण, याची किट बनवून घरोघरी पोहोचवली आहे. तसेच जुळे सोलापुरातील डॉक्टर बगले यांच्या दवाखान्यात कोरोना पासून संरक्षणासाठी कोविड प्रतिबंधक लस केंद्र उभे करून व रेडमीसीअर इंजेक्शन उपलब्ध करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत हे सर्व सामान्य जनता विसरलेली नाही.

विकास कामासाठी त्यांचा अभ्यासू पाठपुरावा उल्लेखनीय आहे कोणताही गर्व घमंड न बाळगता नम्रतेने सोलापूर महानगरपालिका प्रशासनातील अनुभवी अधिकारी यांचे कडून योग्य तो सल्ला घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवत असतात ही विशेष बाब आहे. 2017 पासून नगरसेवक पदावर असताना त्यांनी अनेक नगराचा कायापालट केलेला आहे व त्यांच्या कार्यकाल संपलेला असताना सुद्धा सोलापूर महानगरपालिका आयुक्त, यांना पत्र व्यवहार करून अनेक समस्या सोडवीत आहेत. त्यामुळे जवळपास 250 नगरात त्यांच्याच नावाची चर्चा सध्या सुरू आहे.

नगरसेवकाचा कार्यकाळ संपल्यानंतर विद्यमान आमदार यांना जवळपास दहा ते पंधरा वेळा विकासापासून वंचित असलेल्या नगराचा विकास काम करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु जाणून बुजून व वाढलेली लोकप्रियता पाहून डावलण्यात आलेले आहेत ही खेदाची बाब आहे त्यामुळे विद्यमान आमदारावर प्रभाग 26 मधील अनेक नगरे नाराज आहेत व नागरिकांच्या समस्यासाठी झटणाऱ्या नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या पॅनलला निवडून देण्याचा निर्धार केलेला आहे. विशेष म्हणजे 2017 साली भाजपकडून प्रभाग क्रमांक 26 मध्ये त्यांना उमेदवारी दिली होती व त्या निवडूनही आल्या आहेत. व सातत्याने विकास कामे करून काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपमय करून ठेवलेला आहे. 

असे उल्लेखनीय जनतेसाठी काम करीत असताना भाजप पक्षांनी त्यांना नाकारणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणे हे होय. हीच संधी साधून ज्येष्ठ समाजसेवक, माजी नगरसेवक तथा मजरेवाडीचे सरपंच आप्पासाहेब हत्तुरे व राष्ट्रवादी अजित दादा गटाचे शहर अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांना प्रभाग 26 ची मोठी जबाबदारी दिलेली आहे व ती यशस्वी करून दाखवणार. 

ही विकासासाठी धडपडणारी जोड- गोळी सर्वसामान्य जनतेच्या मनात बसली असून व विचार करत आहेत की एक नगरसेवक असताना मी स्वार्थीपणे अनेक नगराची कामे केलेली आहेत जर त्यांचं पॅनलच निवडून आलं तर किती विकास होईल ह्याच उद्देशाने सर्व नगरातून त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. 

ते इतर नगरसेवक सारखे धनदांडगे, फॉर्च्यूनर,इनोवा, एसी मधून फिरणारे नसून सर्वसामान्य जनते मध्ये वावरणारे आहेत. 

प्रत्येकाशी आदराने बोलणे, फोन केल्याने सन्मानाने बोलणे, एखादा मिस कॉल पडला तरी परत फोन करणे, हीच त्यांची खासियत आहे व सर्वसामान्य जनतेलाही तेच पाहिजे. त्यासाठी कुठल्याही आमिषाला बळी न पडता विकासासाठी धडपडणाऱ्या यांच्याच पाठीमागे सर्व सामान्य जनता व सुज्ञ नागरिक असणार आहे प्रत्येक नगरात त्यांच्याच नावाची चर्चा चालू आहे.

त्यामुळे प्रभाग 26 मध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे संपूर्ण पॅनल विजय करून चमत्कार करून दाखवणार.

सर्वसामान्य जनता यांना फक्त जो आपल्यासाठी धडपडतोय, जनतेच्या हाकेला धावून येतोय हे महत्त्वाचं आहे.

त्यानी इमानदारीने, निस्वार्थीपणे, कुठलेही अपेक्षा न बाळगता काम करून  सहकार्य केलेलं आहे याचीच पावती म्हणून  प्रभाग 26 मधील सर्व नागरिकांना नम्रतेने आवाहन केलेले आहे.

येत्या पंधरा तारखेला भरघोस मतदान करून व  सोळा तारखेला संपूर्ण पॅनल निवडून दिल्याबद्दल गुलाल उधळायचा आहे व सर्वसामान्य जनता काय करू शकते हे दाखवून द्यायचे आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments