मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त आज मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयामध्ये जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. त्यानंतर अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा दिला.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार जिल्हा सचिव लक्ष्मण महाडिक सर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे वधुवर कक्षाचे राम माने ,राजू व्यवहारे, शिवधर्म परिषदेचे शिवाचार्य गोवर्धन गुंड ,जिजाऊ ब्रिगेडच्या उज्वलाताई साळुंखे , अभींजली जाधव ,जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष प्रीती कदम ,लता ढेरे या उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन चव्हाण, नितीन मोहिते, राजू व्यवहारे, प्रकाश डोंगरे, अंबादास सपकाळे नरेश मोहिते, राजेंद्र भोसले,इत्यादीने परिश्रम घेतले.

0 Comments