पूर्व भागात मार्कंडेय जन्मोत्सवाची धूम; रक्तदान, अन्नदान कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भगवान श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त शहराच्या पूर्व भागात सुमारे दोनशे ठिकाणी श्री मार्कंडेय मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २१ जानेवारी रोजी जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला माधव नगर परिसरातील श्री प्रतिष्ठानच्या वतीने श्री मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी वैदिक मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले असून शिवलिंग पूजन व दीपप्रज्वलनामुळे माधव नगर परिसर भक्तिमय झाला. तसेच सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरावर पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त पूर्व भागातील विविध मंडळांच्या वतीने रक्तदान शिबिरे, अन्नदान कार्यक्रम तसेच धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने बुधवारी कुचन प्रशालेच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी दिली.
या काळात मार्कंडेय मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय युवजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा, प्रभाकर दिकोंडा, गोवर्धन बोगा, सुरेश कोकटनूर, अॅड. संदीप संगा, संतोष संगा, किसन पासकंटी, अजय आडम, विजय जटला, प्रकाश सामल, व्यंकटेश अंदाल, राजू पुट्टा, वैजनाथ उघडे, संतोष चोळ्ळे, महेश कल्याणम, बालाजी श्रीचिप्पा, अमोल पराळकर, अक्षय मंगळारम, राजू गाडी, बालाजी जोरीगल, श्रीपाद राजुल, महेश शेराल, अशोक कुरापाटी, अंबरीश पुठ्ठा, अक्षय वाघमारे, विनायक नल्ला, राहुल पसलादी, शेखर भोसले, स्वप्निल पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.
.png)
0 Comments