Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजा पाटकर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी

 जिजा पाटकर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी




 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार-पाटकर यांची मुलगी कु.जिजा ज्योतिर्लिंग पाटकर हिचा इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल हिला शाळेकडून सन 2025-26 करिता सर्वोत्कृष्ट विद्यार्थी (बेस्ट स्टुडन्ट फॉर द इयर 2025-26) या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.
कु.जिजा ज्योतिर्लिंग पाटकर ही अभ्यास ,खेळ, विविध स्पर्धात्मक परीक्षा यामध्ये अग्रेसर असल्यामुळे शाळेकडून तिला सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या आई श्रीमती वीणा पवार पाटकर या सध्या अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका म्हणून कार्यरत आहेत तसेच वडील ज्योतिर्लिंग गणपत पाटकर हे उप अभियंता म्हणून जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहेत .
इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल  च्या वतीने 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बेस्ट स्टुडन्ट फॉर द इयर 2025- 26 हा अवॉर्ड घोषित केला गेला ,या निमित्ताने अतिरिक्त आयुक्त वीणा पवार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व भारत देशासाठी आपले सैनिक ज्याप्रमाणे जीवाची कोणतीही पर्वा न करता आपल्या सीमारेषेचे रक्षण करत असतात त्याचप्रमाणे आपणही एक चांगले नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांची मुलगी जिजा हिला मिळालेल्या सन्मानाबाबत त्या म्हणाल्या की प्रत्येक पालकाला आपला मुलगा किंवा मुलगी मोठ्या यशाच्या शिखरावर जावे असे वाटत असते त्यासाठी पालक सातत्याने तळमळीने प्रयत्न करत असतात मुलांनी सुद्धा आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली पाहिजे. त्यांच्या मुलीला मिळालेला पुरस्कार हे केवळ त्यांच्या कुटुंबीयांचे यश नसून इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अमोल जोशी, श्रीमती सायली जोशी मॅडम ,श्रीमती मानसी जोशी,मुख्याध्यापिका व श्रीमती वळसे टीचर, श्रीमती जोशी टीचर,श्रीमती  प्रीती स्वामी टीचर, हॉकी प्रशिक्षक अजय चाबुकवार तसेच  सर्व शिक्षक यांचे यश आहे. त्याच्या मुलीच्या जडणघडणीमध्ये इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल चा सिंहाचा वाटा आहे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थी हा कुटुंबापेक्षा शाळेत जास्त कालावधी वेळ घालवतो त्यामुळे त्यांच्या जडणघडनी मध्ये ,त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शाळा महत्वपूर्ण योगदान देत असते.
खरे अभिनंदन तर शाळेचेच केलं पाहिजे जे आदर्श विद्यार्थी घडवतात असं त्या यावेळी म्हणाल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments