Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण ची धडाकेबाज कारवाई

 स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण ची धडाकेबाज कारवाई

अवैध हातभट्टी निर्मीतीच्या ठिकाणी छापे टाकुन 26 लाख 30 हजार रू. किमतीचा मुद्देमाल केले नष्ट

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यास व सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर | कठोर कारवाई करण्याबाबत अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सुचना तसेच आदेश दिले होते.

त्या सूचनांच्या अनुषंगाने संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, | सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिनांक ३१/१२/२०२५ रोजी मौजे मुळेगाव तांडा, तालुका दक्षिण सोलापूर येथे अवैध हातभट्टी व्यवसायावर मोठी व प्रभावी कारवाई केली. सदर कारवाईदरम्यान | घटनास्थळी अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे कच्चा माल, चुल, लोखंडी बॅरल, प्लास्टिक | बॅरलमध्ये भरलेले गुळ - मिश्रीत रसायन, तसेच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक इतर साहित्य असा एकूण अंदाजे ₹२६,३०,०००/- (रु. सव्वीस लाख तीस हजार) किमतीचा मुद्देमाल आढळून आला. सदर अवैध साहित्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अवैध हातभटी तयार करण्याच्या उददेशाने साहित्य बाळगल्याबाबत ०५ सराईत हातभटटी व्यवसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती व विक्री करणारऱ्यां विरुद्ध भविष्यातही अशाच | प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही व त्यांच्या विरुध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची कामगिरी ही अतुल वी.कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, यांच्या मार्गदर्शनाखाली, संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,भिमगोंडा पाटील, | सहा. पोलीस निरीक्षक, कुलदिप सोनटक्के, पोलीस उप निरीक्षक, पो.हे.कॉ. सलिम बागवान, पो.हे. कॉ. विजय भरले, पो.हे.कॉ. मोहन मनसावाले, पो.हे.कॉ. धनराज गायकवाड, पो.हे.कॉ. अनीस शेख, पो. कॉ. सागर ढोरेपाटील, पो. कॉ. प्रमोद शिंपाळे, ने. स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर यांनी सदरची कामगीरी | केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments