निधी न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार
अकलूज (कटूसत्य वृत्त):- ग्रामपंचायतीला निधी मिळत नसल्यामुळे, गाव विकासापासून वंचित राहू लागले आहे.पुढील कालावधी मध्ये संगम ग्रामपंचायतीला निधी प्राप्त न झाल्यास,संगम ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य सामूहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा मासिक मीटिंग मध्ये देण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यातील संगम ग्रामपंचायतीची नुकतीच मासिक मीटिंग संपन्न झाली.यावेळी सरपंच , उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. सदर मीटिंग मध्ये संगम ग्रामपंचायतीला निधी मिळत नसल्याकारणाने गावात विकास कामे होत नाहीत म्हणुन सर्वांनी खंत व्यक्त केली.
निधी मिळत नसेल तर खुर्चीवर बसून करायचं काय?असा प्रश्न सरपंच उपसरपंच यांनी उपस्थित केला.
तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती येथे,मागील तीन वर्षापासून प्रशासक असल्याकारणाने कोणतेही विकास कामे होत नाहीत. ग्रामपंचायतीकडे निधी जर का मिळत नसेल तर विकास कामे कशी करावी असे सरपंच उपसरपंच यांनी भावना व्यक्त केली.तर पुढील कालावधीमध्ये निधी न मिळाल्यास आम्ही सामूहिक राजीनामे, जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहोत असा इशारा ग्रामपंचायत मासिक मीटिंग मध्ये दिला आहे.
*चौकट*
मौजे संगम येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून,अनेक नागरिकांनी सदर योजने अंतर्गत 50 टक्के घरपट्टी सवलतीचा लाभ घेताला.यावेळी सरपंच नारायणराव भगवान देशमुख व उपसरपंच कुंडलिक जनार्दन ताटे, सदस्य सतीश पांडुरंग इंगळे,ग्रामस्थ अण्णासाहेब शंकर केचे उपस्थित होते.यावेळी सरपंच नारायणराव भगवान देशमुख यांनी संगम येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाला चांगल्या प्रकारे ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

0 Comments