Hot Posts

6/recent/ticker-posts

निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे पिकांचे मोठे नुकसान

 निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे पिकांचे मोठे नुकसान

खा. धैर्यशील मोहिते पाटील 

अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याबाबत तातडीने चौकशी व कारवाई करण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         सदर निवेदनात  माढा तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांकडून वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे द्राक्ष, कांदा व खरबूज या पिकांचे प्लॉटच्या प्लॉट जळून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असल्याची अत्यंत गंभीर तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. खतांचा वापर केल्यानंतर काही दिवसांतच संपूर्ण प्लॉट नष्ट होणे असे प्रकार घडत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आतापर्यंत अंदाजे दोन कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक नुकसान झालेले आहे.

सदर परिस्थितीमुळे माढा तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, स्थानिक बाजारात विक्रीस असलेल्या काही खतांच्या गुणवत्तेबाबत तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत तातडीने दखल न घेतल्यास आगामी काळात नुकसान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी सदर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून संबंधित खतांचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत तसेच दोषी उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या विषयावर त्वरित कार्यवाही करून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल मला अवगत करावा असे नमूद करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments