Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 टेंभुर्णीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त ):- 
टेंभुर्णी शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुर्डूवाडी चौक, टेंभुर्णी येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख म्हणाले,
“स्व. बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक नेते नव्हते तर ते मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद त्यांनी सर्वसामान्य माणसाला दिली. त्यांच्या विचारांवर चालत शिवसेना आजही जनतेसाठी लढत आहे.”

या कार्यक्रमास टेंभुर्णी येथील पार्टीचे गटनेते व माजी सरपंच श्री. प्रमोद कुटे, उपतालुका प्रमुख श्री. सुरेश लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष औदुंबर भाऊ महाडिक देशमुख, युवा नेते यशपाल लोंढे, सिकंदर आतार, शहर प्रमुख सोपान ढगे, विष्णू बिचकुले, शहर उपप्रमुख प्रशांत सोनवणे, दादा कोळपे, चंद्रकांत कोठावळे, आबा रेडे, अनिल जगताप, गणेश पोळ, ॲड. तुकाराम राऊत, समीर नाईकनवरे, सुरज जाधव, आशिष लोंढे, विकी जगताप आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments